गणेश मंदिर संस्थानची निवडणूक नऊ रोजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश मंदिर संस्थानची निवडणूक नऊ रोजी
गणेश मंदिर संस्थानची निवडणूक नऊ रोजी

गणेश मंदिर संस्थानची निवडणूक नऊ रोजी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर संस्थानच्या विश्वस्त पदांकरिता येत्या रविवारी (ता. ९) निवडणूक होणार आहे. ११ विश्वस्तपदांसाठी ही निवडणूक होणार असून यासाठी १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. श्री गणेश मंदिर संस्थानचे हे ९८ वे वर्ष असून २०२२ ते २०२७ या वर्षांकरिता पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. १३ उमेदवारांनी अर्ज भरला असून यात एक महिलांसाठी राखीव पद आहे. या जागेवर गौरीताई खुंटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळी ८.३० ते १२.३० दरम्यान मतदानाची वेळ असून त्यानंतर मतमोजणी होईल. त्याच दिवशी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वार्षिक सभेमध्ये निर्णय जाहीर केला जाईल.