मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. मनसे विद्यार्थी सेनेच्या कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्षपदी धनंजय गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी मनसेच्या विद्यार्थी सेना अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांचा दौरा केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. तेव्हापासूनच ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची फेररचना होणार असल्याची चर्चा होती. यानंतर राजगड या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात धनंजय गुरव यांना कल्याण लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली. गुरव हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असून २००७ पासून त्यांच्यावर मनविसेच्या अंबरनाथ शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती. तर मनविसेचे सध्याचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई यांना महाराष्ट्र सरचिटणीस पदावर बढती देण्यात आली असून मनविसेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष असलेले मनोज शेलार यांना जिल्हा संघटक पदी बढती देण्यात आली आहे. तर मनविसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सचिन आंबोकर यांची मनविसे अंबरनाथ शहर अध्यक्षपदी, डोंबिवली अध्यक्षपदी मिलींद म्हात्रे, कल्याण अध्यक्षपदी विनोद केणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्यासह मनविसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.