जव्हारमध्ये कुष्ठरोगाचे ३२ नवे कुष्ठ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये कुष्ठरोगाचे ३२ नवे कुष्ठ रुग्ण
जव्हारमध्ये कुष्ठरोगाचे ३२ नवे कुष्ठ रुग्ण

जव्हारमध्ये कुष्ठरोगाचे ३२ नवे कुष्ठ रुग्ण

sakal_logo
By

जव्हार, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत कुष्ठ आणि क्षयरुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. यामध्ये एक लाख ५४ हजार १७१ जणांची तपासणी करण्यात आली. यातून ६९७ संशयित कुष्ठरुग्ण आढळले. त्यांची तपासणी केल्यानंतर ग्रामीण भागातून ३०; तर शहरी भागात दोन असे ३२ कुष्ठरोग रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तपासणी केलेल्या लोकसंख्येच्या ०.५ टक्के संशयित रुग्ण शोधणे अपेक्षित होते; परंतु तालुक्यात ०.३२ टक्के संशयित शोधण्यात आले. तालुक्यात १ ऑक्टोबरपर्यंत ६९७ संशयितांची तपासणी करण्यात आली होती. या संशयितांमधून ३२ नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले आहेत. कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत संपूर्ण जव्हार तालुक्याची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली. यासाठी यासाठी आशा आणि पुरुष स्वयंसेवकांची १०७ पथके तयार करून घरोघर सर्वेक्षण करण्यात आले; तर सर्वेक्षणात आढळलेल्या रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत, असे पंचायत समिती आरोग्य विभागाचे कुष्ठरोग तंत्रज्ञ अनिल पाटील यांनी सांगितले.