विक्रमगड हायस्कूल येथे नूतन वास्तूचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड हायस्कूल येथे नूतन वास्तूचे उद्‌घाटन
विक्रमगड हायस्कूल येथे नूतन वास्तूचे उद्‌घाटन

विक्रमगड हायस्कूल येथे नूतन वास्तूचे उद्‌घाटन

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) ः विक्रमगड येथील छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे जितेंद्र भन्साळी विक्रमगड हायस्कूल येथे नूतन इमारतीचा उद्‌घाटन सोहळा पार पडला. वॉक-टुगेदर फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या या नूतन इमारतीचे उद्‌घाटन जितेंद्र भाई भन्साळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी परमपूज्य स्वामीजी, राम स्वरूप महाराज, सुरेश उपाध्याय, विंदा कनालकर, कुंजलता भन्साळी, निरव भन्साळी, मनुभाई, नवीन शहा, कांती भाई, हिरेन गोसलिया, अमृत भाई पटेल, जनार्दन गोतारणे, नजीर शेख, विक्रमगड पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, संस्थेचे उपाध्यक्ष फडके, कार्याध्यक्ष तरटे, मुख्याध्यापक घोलप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.