लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुखरुप सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुखरुप सुटका
लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुखरुप सुटका

लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुखरुप सुटका

sakal_logo
By

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : इमारतीची लिफ्ट मध्येच बंद पडल्यामुळे सुमारे पाऊण तास अडकून पडलेल्या दोन जणांची मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. मिरा रोड येथील कनाकिया परिसरात सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कनाकिया परिसरातील रश्मी प्राईम कॉर्नर या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या सिमेंटवाला कुटुंबातील पंधरावर्षीय आदम व त्याच्यासोबत बावीस वर्षीय सारा हे दोघे जण रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लिफ्टने खाली उतरत होते; पण तळमजला येण्याआधीच लिफ्ट पहिला मजला व तळमजला यांच्यामध्ये अडकली. याची माहिती मुलांनी घरच्यांना दिली. त्यानंतर लिफ्टवाल्यांना पाचारण करण्यात आले; पण त्यांनी प्रयत्न केल्यानंतरही लिफ्ट सुरू झाली नाही. त्यामुळे अखेर अग्निशमन दलाला त्याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचा दरवाजा कापून दहा मिनिटांत दोघांची सुटका केली. लिफ्टची देखभाल दुरुस्ती वेळेवर केली नव्हती ही लिफ्ट अडकून पडली, अशी माहिती इमारतीमधील रहिवाशांनी दिल्याचे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.