तानसा वन विभागातर्फे वन्यजीव सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तानसा वन विभागातर्फे वन्यजीव सप्ताह
तानसा वन विभागातर्फे वन्यजीव सप्ताह

तानसा वन विभागातर्फे वन्यजीव सप्ताह

sakal_logo
By

शहापूर, ता. ४ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यातील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल व तानसा वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्काऊट-गाईड विद्यार्थी व शिक्षकांनी तानसा अभयारण्यात एकदिवसीय विशेष श्रमदान व वन्यजीव सेवा शिबिराचा लाभ घेतला. तानसा अभयारण्यातील वनपरिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ करीत श्रमदान केले. विद्यार्थ्यांनी सामुदायिक श्रमदान केले आणि श्रमदानातून तेथील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे स्वच्छतेची कामे केली. तसेच आपल्या जीवनात वनांचे व वन्य प्राण्यांचे महत्त्व जाणून घेतले. यावेळी तानसा वन विभागाचे अधिकारी समीर इनामदार, वनरक्षक खंदारे, वनरक्षक प्रतीक्षा हरणे, कळमगाव वनपाल विलास भेरे व इतर सर्व अधिकारी यांनी या अभयारण्यात आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची, पशू-पक्षी यांच्याविषयी माहिती दिली. या अभिनव उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, समस्त विश्वस्त मंडळ व आत्मा मालिक ध्यानपीठ शहापूर शाखेचे कार्याध्यक्ष उमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात, प्राचार्य आशीष काटे, उपप्राचार्य पंकज बडगुजर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट विभागप्रमुख विजय बैसाणे व सहायक अविनाश काटकर, समाधान जाधव, मंगेश राऊत, लक्ष्मण साळुंखे, अश्विनी काटे यांनी विशेष परिश्रम घेतले.