कासामध्ये खरेदीसाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासामध्ये खरेदीसाठी गर्दी
कासामध्ये खरेदीसाठी गर्दी

कासामध्ये खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By

कासा, ता. ४ (बातमीदार) : विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त कासा बाजारपेठ झेंडू, शेवंती या प्रमुख फुलांबरोबर विविध फुलांनी गजबजली आहे. विविध भागांतून गेल्या दोन दिवसांपासून झेंडू आणि शेवंतीची मोठ्या प्रमाणावर विकण्यास आली आहेत. या वर्षी नवरात्र आणि दिवाळीचे नियोजन करून अनेक शेतकऱ्यांनी भगवा आणि पिवळ्या झेंडूची लागवड केली आहे. नवरात्रात अनेक ठिकाणी फूल उत्पादक शेतकरी फुलांची विक्री करत आहेत; तर दसऱ्यानिमित्त हॉटेल, दुकाने, घरात, वाहनावर लावण्यासाठी प्रत्येक नागरिक फुलांची खरेदी करत आहे.