घरोघरी रक्तदाबाच्या रुग्णांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरोघरी रक्तदाबाच्या रुग्णांची तपासणी
घरोघरी रक्तदाबाच्या रुग्णांची तपासणी

घरोघरी रक्तदाबाच्या रुग्णांची तपासणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा 

मुंबई, ता. ४ : मुंबईकरांमध्ये रक्तदाब, मधुमेहाचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रभागनिहाय घरोघरी रक्तदाबाने त्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी मोहीम राबवणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून सहा हजार मशीन खरेदी केल्या जाणार आहेत. या मोहिमेत साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत राहणार असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.

रोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सुविधांचे नियोजन व अंमलबजावणी केले जात आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाब व मधुमेह कमी वयापासून होतो. पालिकेच्या आरोग्य विभागाने नुकताच केलेल्या सर्वेक्षणात १८ ते ६९ वयोगटामध्ये मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. यात ३४ टक्के रुग्ण रक्तदाबाचे तर १९ टक्के रुग्ण मधुमेहाचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने रक्तदाब व मधुमेहाच्या तपासणीवर पालिका आरोग्य विभागाकडून भर देण्यात आला आहे. 

निविदेनंतरच मोहिमेला सुरुवात
आरोग्य सेवा-सुविधांचे लोकसंख्या आधारित विश्लेषण हे विभागस्तरीय पद्धतीने केले जाणार आहे. आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविका यांच्याद्वारे गृहभेटी देण्यात येऊन रक्तदाब विषयक माहिती गोळा करून असंसर्गजन्य रोग प्रतिबंध (एनसीडी) कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. घरोघरी रुग्ण तपासणी मोहिमेसाठी आशा वर्करसह साडेतीन हजार कर्मचारी मोहिमेत कार्यरत राहणार आहेत. मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या मोहिमेला सुरुवात होईल, असे गोमारे यांनी सांगितले.