बिनविरोधचा निर्णय अभिनंदनास पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिनविरोधचा निर्णय अभिनंदनास पात्र
बिनविरोधचा निर्णय अभिनंदनास पात्र

बिनविरोधचा निर्णय अभिनंदनास पात्र

sakal_logo
By

मनोर, ता. ४ (बातमीदार) ः विकासाचा दृष्टिकोन बाळगून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पाडण्यात नागझरी गावाच्या ग्रामस्थांना यश आले. ग्रामस्थांचा निर्णय अभिनंदनास पात्र असून पंचक्रोशीतील गावांनी नागझरी गावाच्या निर्णयाचे अनुकरण केले पाहिजे, असे मत मनोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी व्यक्त केले. दगड, खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना संबोधित करताना ते बोलत होते. सोमवारी (ता. ४) सायंकाळी नागझरी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव, पाड्यांमध्ये तणाव निर्माण होत असतो. ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरत असल्याने दारू आणि पैशांचा चुराडा केला जातो. उमेदवारांकडून मते मिळवण्यासाठी मतदारांना आमिषे दाखवली जात असल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात येत असते. निवडणूक प्रक्रियेत पैशांचा अपव्यय तर होतो; शिवाय गाव, पाड्यामधील एकताही खंडित होत आहे. अनेकदा वाद होवून गुन्हे दाखल होतात. गटातटातील वाद मिटवून गावात शांतता नांदावी यासाठी नागझरी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मनोर पोलिस ठाणे हद्दीतील गावांनी नागझरीच्या ग्रामस्थांचा आदर्श घेत बिनविरोध निवडणुका पार पाडण्याचे आवाहन कसबे यांनी केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य कमलाकर अधिकारी, भिमा भांगरे, उद्योजक हरेश अधिकारी, रमेश अधिकारी, रूपेश अधिकारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष विश्र्वास अधिकारी, माजी सरपंच प्रवीण अधिकारी, राजेश दाडोडा, मोहन कुऱ्हाडा, पोलिस नाईक उत्तम बिरारी, हवालदार दिलिप जणाठे, निलेश शिंगाडे, रमेश आहाडी, संदीप फडतरे, हरेश ठाकरे आणि नागझरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट
उमेदवारांचा सत्कार
बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच कविता भुरकुड, सदस्य सुदेश पाटील, हिमाली अधिकारी, निशा धापशी, विनोद भुरकुड, जयेश काकड, प्रियंका खरपडे, नामदेव अधिकारी, आरोही अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.