मंदिरात दाम्पत्याला धक्का-बुक्की आणि शिवीगाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंदिरात दाम्पत्याला धक्का-बुक्की आणि शिवीगाळ
मंदिरात दाम्पत्याला धक्का-बुक्की आणि शिवीगाळ

मंदिरात दाम्पत्याला धक्का-बुक्की आणि शिवीगाळ

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ (वार्ताहर) ः ठाण्याच्या गावदेवी मंदिरात दर्शनासाठी विनवणी करणाऱ्या दाम्पत्याला मंदिरातील ट्रस्टी यांनी धक्काबुक्की करीत शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. तक्रारदार समीर पांडुरंग उतेकर यांनी ट्रस्टी साळुंखे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद नौपाडा पोलिस ठाण्यात केली. फिर्यादी उतेकर दाम्पत्य हे खारेगाव रघुनाथ अपार्टमेंट, कळवा येथे राहणारे आहेत. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गोखले रोड, गावदेवी मंदिरात गेले होते; मात्र उशीर झाल्याने मंदिराचे गेट बंद होते. उपस्थित ट्रस्टी साळुंखे यांनी गेट उघडून दर्शनास नकार दिला; मात्र तक्रारदार यांनी तगादा लावल्याने साळुंखे यांनी समीर याना धक्काबुक्की केली, तर पत्नीशी गैरवर्तवणूक केली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.