डोंबिवलीकरांच्या सहनशीलतेला मानाचा मुजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीकरांच्या सहनशीलतेला मानाचा मुजरा
डोंबिवलीकरांच्या सहनशीलतेला मानाचा मुजरा

डोंबिवलीकरांच्या सहनशीलतेला मानाचा मुजरा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः सुशिक्षित, सुसंस्कृत, साहित्यिक, कवी अशा सगळ्या लोकांचा भरणा असलेल्या शहरात एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डा नाही; मग यांची बुद्धी कोठे गेली. निदान कमीत कमी या शहराचा विकास झाला नाही, हे तरी त्यांच्या लक्षात यायला पाहिजे; की डोळे बांधून फिरायचे आणि मतदान करायचे, असे काही डोंबिवलीत घडत नाही ना, असा विचार माझ्यासारख्याच्या डोक्यात येतो. जो कोणी दुसरा-तिसरा माणूस बाहेरून येईल, तो डोंबिवलीच्या रस्त्यावरून जेव्हा फिरेल, तो डोंबिवली मतदारांविषयी हास्यविनोद करेल, त्याबद्दल त्यांनी खात्री बाळगावी, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीकरांवर केली. अन्याय आणि अत्याचार होत असताना तो सहन करून घरी टीव्ही कसा बघता बसायचा, हे उभ्या महाराष्ट्राने डोंबिवलीकरांकडून शिकावे, त्यांच्या सहनशीलतेला माझा मानाचा मुजरा, असे म्हणत त्यांनी येथील मतदारांचे कान पिळले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्ह्यातर्फे डोंबिवली गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, जगन्नाथ शिंदे, वंडार पाटील, शिवसेनेचे ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, विवेक खामकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डोंबिवलीतील समस्यांवरून आमदार आव्हाड यांनी येथील मतदारांचे चांगलेच कान पिळले. ते म्हणाले, येथे येत असताना प्रत्येक मिनिटाला रस्त्यावर खड्डे येत होते. तुमच्यापेक्षा माझा कळवा-मुंब्रा लाखपटीने बरा आहे, असे म्हणत त्यांनी डोंबिवलीतील रस्त्यांवरून सत्ताधाऱ्यांवर आणि डोंबिवलीकरांवर ताशेरे ओढले. सुसंस्कृत, सुशिक्षित, विद्येचे माहेरघर अशी अनेक बिरुदावली असलेले डोंबिवली शहर आहे. जनतेचे वाईट वाटते, की कोणत्या आधारावर तुम्ही मते देता, असा सवाल त्यांनी केला.


फडणवीस यांना टोला
----------------------------
ठाणे जिल्ह्याचे पालकत्व साताऱ्याचे शंभूराज देसाई यांना दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची निवड केली आहे. यावर गुगली टाकत आमदार आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. पालकमंत्र्यांबद्दल मला काही बोलायचे नाही. ते कार्यक्षम आहेत आठ, आठ जिल्हे ते सांभाळू शकतात. ते कार्यक्षम असल्याने त्यांना ते दिलेत. आपण काय बोलावे, असे ते म्हणाले.