दसरा मेळावा ठाणे ग्रामीण भागातून १८५ एसटी बसेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळावा ठाणे ग्रामीण भागातून १८५ एसटी बसेस
दसरा मेळावा ठाणे ग्रामीण भागातून १८५ एसटी बसेस

दसरा मेळावा ठाणे ग्रामीण भागातून १८५ एसटी बसेस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे/पडघा/उल्हासनगर, ता. ४ : राज्याच्या सत्तांतरावरून ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत. त्यातच दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्यातील वाद आणखीच उफाळल्याने या मेळाव्यात गर्दी जमवण्यावरून रसीखेच सुरू झाली आहे. यासाठी एसटीच्या ठाणे विभागातून तब्बल १८५ गाड्यांचे बुकिंग बीकेसीसाठी झालेले आहे. यामध्ये सर्वाधिक १६० गाड्या भिवंडीतून बुक केलेल्या आहेत. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे शिंदे गटात गेल्याने मेळाव्यासाठी त्यांनी १०० बसेस दिल्या असून शिंदे गटाचे शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्यासाठी बसेसचे नियोजन केले असल्याचे आमदार शांताराम मोरे यांनी सांगत ३० ते ४० गावातून ५ ते ६ हजार शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भिवंडी आणि वाडा या भागातून लोकल प्रवास करता येत नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणावरून एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. १८५ पैकी १६० बसेस भिवंडी; तर उर्वरित २० बसेस वाड्यातून बीकेसी येथे रवाना होणार आहेत, अशी माहिती ठाणे एसटी विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली; तर उल्हासनगरमधून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी ५० हून अधिक बसेस तसेच खासगी वाहने ही मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत. शिंदे गटाचे माजी नगरसेवक अरुण आशान, राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी ही माहिती दिली.