मेट्रोची नासधूस करणारे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोची नासधूस करणारे अटकेत
मेट्रोची नासधूस करणारे अटकेत

मेट्रोची नासधूस करणारे अटकेत

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : चारकोप येथील मेट्रो डेपोमध्ये २६ सप्टेंबरला मेट्रो डब्यांची नासधूस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार इटालियन नागरिकांना गुजरातच्या अहमदाबादमध्ये स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. कुडिनी इटालियाना (२४), बाल्डो इटालियाना (२९), स्टारिनेरी इटालियाना (२१) आणि कॅपेकी इटालियाना (२७) अशी चौघांची नावे आहेत. यापूर्वीच एमएचबी कॉलनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या चौघांनी अहमदाबादमधील गोमतीपूर येथेही मेट्रोच्या डब्यांची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, चौघांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.