कम्युनिटी हॉलमध्ये ५० हजारांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कम्युनिटी हॉलमध्ये ५० हजारांची चोरी
कम्युनिटी हॉलमध्ये ५० हजारांची चोरी

कम्युनिटी हॉलमध्ये ५० हजारांची चोरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : वांद्रे पूर्वेतील कलानगर रहिवासी संकुलातील कम्युनिटी हॉलमध्ये चोरीचा प्रकार घडला. कलानगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अरुण नाईक यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. रविवारी सायंकाळी चोराने कलानगरमधील कम्युनिटी हॉलमधून ५० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरल्याचा आरोप आहे. चोराचे हे कृत्य तेथील सीसीटीव्ही कॅमेरात टिपले गेले. प्लॉट २३, २४ आणि २५ च्या मागील गेटमधून चोर कलानगरमध्ये प्रवेश करताना फुटेजमधून दिसून आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.