जोगेश्‍वरीत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेश्‍वरीत आरोग्य शिबिर
जोगेश्‍वरीत आरोग्य शिबिर

जोगेश्‍वरीत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. ६ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्वेकडील वॉर्ड क्र. ७३ चे नगरसेवक प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. येथील संजय गांधी नगर व संत रोहिदास नगरमधील रहिवाशांकरिता मुंबई महापालिकेच्या वतीने सायली मिर्लेकर याच्‍या पुढाकाराने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’, ‘मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान’ या अभियानांतर्गत मोफत शिबिर घेण्‍यात आले. कलिमाता सेवा संघजवळील शिवशक्ती नवरात्रोत्सव मंडळाने विभागातील माता आणि भगिनींच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याकरिता आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचा सुमारे ८० रहिवाशांनी लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता स्क्वाटर्स कॉलोनी आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.