मध्य रेल्वेची पार्सलमधून १२९.१६ कोटींची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेची पार्सलमधून १२९.१६ कोटींची कमाई
मध्य रेल्वेची पार्सलमधून १२९.१६ कोटींची कमाई

मध्य रेल्वेची पार्सलमधून १२९.१६ कोटींची कमाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीतील (एप्रिल ते सप्टेंबर) भाड्याव्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसुलात ३२.७३ कोटी आणि पार्सल महसुलात १२९.१६ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १९८ टक्क्यांची प्रभावी वाढ झाली आहे. तसेच सप्टेंबर-२०२२ मध्ये २६१.५० लाख रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्कासह २९ भाडे-व्यतिरिक्त महसूल करार ई-लिलावाद्वारे देण्यात आल्याची माहितीही मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती, अकोला, भुसावळ, नाशिक रोड आणि शेगाव येथे ५ वर्षांच्या कालावधीसाठी १३०.६३ लाख रुपये वार्षिक महसुलासह रेल कोच रेस्टॉरंट्स उभारण्यासाठी कंत्राटे देण्यात आली आहेत. तसेच भुसावळ गुड्स यार्डमधील बॉक्स एन प्रकारच्या वॅगन्सच्या साफसफाईचे कंत्राट ५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले असून वार्षिक रुपये ३०२.८४ लाख महसूल प्राप्त झाला आहे. अकोला, भुसावळ, जळगाव आणि नाशिक रोड येथे आपत्कालीन वैद्यकीय कक्षांचे कंत्राट ५ वर्षांच्या कालावधीसाठी रुपये २२.२५ लाख वार्षिक महसुलासह देण्यात आले आहे. अशा नावीन्यपूर्ण भाडे-व्यतिरिक्त महसूल कल्पना योजनेंतर्गत मध्य रेल्वेने ३२.७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
...
पार्सल महसूल
आर्थिक वर्ष २०२२-२३च्या पहिल्या सहामाहीत २.५९ लाख टन पार्सल आणि सामानाच्या वाहतुकीद्वारे १२९.१६ कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण महसूल नोंदवला आहे. त्यापैकी सप्टेंबर-२०२२ मध्ये २२.३० कोटींची नोंदणी झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (सप्टेंबरपर्यंत), वेळापत्रकानुसार पार्सल ट्रेनच्या १३३ फेऱ्यांमधून ९.६२ कोटी महसूल प्राप्त केले आहे आणि १७ इंडेंट पार्सल कार्गो एक्स्प्रेस ट्रेनने ३.४९ कोटी महसूल मिळवला. सध्या ८९ सीटिंग कम लगेज रेक आणि १३ पार्सल व्हॅन लीजवर आहेत. त्यापैकी २४ सीटिंग कम लगेज रेक आणि एक पार्सल व्हॅन अलीकडेच ई-लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.