भांडुप मधील सिंग्नल कित्येक महिने बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुप मधील सिंग्नल कित्येक महिने बंद
भांडुप मधील सिंग्नल कित्येक महिने बंद

भांडुप मधील सिंग्नल कित्येक महिने बंद

sakal_logo
By

भांडुप, ता. ६ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम एलबीएस मार्गावरील मधुबन गार्डन शेजारील सिग्नल कित्येक महिने बंद आहे. परिणामी संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. काही वेळेस वाहतूक पोलिस या ठिकाणी उपस्थितही नसतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन हा सिग्नल लवकरात लवकर चालू करण्यात यावा किंवा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात संध्याकाळच्या वेळेस वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
मधुबन गार्डनशेजारी असणाऱ्या मुख्य रस्‍त्‍यावर मुलुंड दिशेने व घाटकोपरच्या दिशेने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. याच मुख्य रस्त्याला दोन रस्ते जोडलेले आहेत. त्‍यातील एक भांडुप पोलिस स्टेशनकडे जाणारा आणि दुसरा विलेज रोड परिसरात जातो. सिग्नल खराब असल्याने या ठिकाणावरून ज्येष्ठ नागरिक शाळेतील लहान मुले यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लवकरात लवकर सिग्नल दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

व्हिलेज रोड परिसरातून ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, कामगार या चौकातून मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. या ठिकाणचा सिग्नल चालू नसल्याने मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधितांना निवेदन देण्यात आले आहे.
– संतोष पार्टे, प्रभाग संघटक, रस्ते साधन सुविधा आस्थापना, एस विभाग मनसे

वाहतूक विभागाकडून महापालिकेला सिग्नल दुरुस्तीसंदर्भात पत्र पाठवलेले आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करून घेण्यात येईल.
– उन्मेष थिटे, प्रभारी पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग