पावसामुळे शेतकरी चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे शेतकरी चिंतेत
पावसामुळे शेतकरी चिंतेत

पावसामुळे शेतकरी चिंतेत

sakal_logo
By

बोर्डी, ता. ६ (बातमीदार) : भातशेती कापणी योग्य झाली आहे, मात्र पावसाची टांगती तलवार असल्यामुळे शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे. चालू वर्षी भात पिकासाठी अनुकूल पाऊस झाल्यामुळे भात पीक उत्तम आले आहे. भात पिके कापणी योग्य झाली आहेत; परंतु निसर्गाची साथ मिळत नसल्यामुळे पिकाची कापणी करण्यात अडचणी येत आहेत. विजयादशमीनंतर दिवाळीपूर्वी भातशेती कापणी केली जाते; परंतु ढगाळ वातावरणामुळे कापणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे.