रेल्वे व पालिका प्रशासनाची स्‍वच्‍छतेबाबत जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे व पालिका प्रशासनाची स्‍वच्‍छतेबाबत जागृती
रेल्वे व पालिका प्रशासनाची स्‍वच्‍छतेबाबत जागृती

रेल्वे व पालिका प्रशासनाची स्‍वच्‍छतेबाबत जागृती

sakal_logo
By

वडाळा, ता. ६ (बातमीदार) ः रेल्वे रुळालगतच्या इमारतीतील अथवा झोपडपट्टी परिसरातील नागरिक अनेकदा कचराकुंडीत कचरा टाकण्याऐवजी खिडकीतून थेट कचरा बाहेर फेकतात. परिणामी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरते. त्याचबरोबर पावसाळ्यात नाले, गटारांमध्ये कचरा अडकल्याने पाणी तुंबण्याची समस्या उद्‌भवून लोकल ठप्प होण्याचे प्रकार घडतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासन व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुरुवारी (ता. ६) स्थानक व्यवस्थापक विनायक शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातील फलाट क्रमांक १ शेजारील बीआयटी चाळ, वाल पाखाडी, डोंगरी पोलिस ठाण्याच्या जवळील परिसरात ‘स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. यात रेल्वे कर्मचारी शिवाजी गिरे, जुनेद खान, मकरंद मोरे, कृष्णा कांबळे, रेल्वे पोलिस असिफ सैय्यद, महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच जीआरपी व आरपीएफ पोलिस अधिकारी व कर्मचारी असा ५० जणांचा सहभाग होता.