पथ विक्रेत्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथ विक्रेत्यांना मार्गदर्शन
पथ विक्रेत्यांना मार्गदर्शन

पथ विक्रेत्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

धारावी, ता. ६ (बातमीदार) : केंद्र सरकार पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पथपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी पालिकेने माहिती व प्रात्यक्षिक शिबिरांचे आयोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या ग/ उत्तर अनुज्ञापन खात्यामार्फत धारावीतील राजर्षी शाहूनगर येथे पंतप्रधान स्वनिधीची माहिती फेरीवाल्यांना देण्यासाठी नुकतेच विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फेरीवाल्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना स्वनिधी योजनेची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. ग/ उत्तर विभागाचे वरिष्ठ परवाना अधिकारी राजन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.