मुले चोरणारी टोळीच्या अफवेने नागरिकांत भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुले चोरणारी टोळीच्या अफवेने नागरिकांत भीती
मुले चोरणारी टोळीच्या अफवेने नागरिकांत भीती

मुले चोरणारी टोळीच्या अफवेने नागरिकांत भीती

sakal_logo
By

रोहा, ता. ६ (बातमीदार) ः रोहा तालुक्यात लहान मुले चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. काही महिला लहान मुले चोरण्याच्या उद्देशाने गावोगावी फिरत असल्‍याची अफवा सध्या रोह्यात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चणेरा विभागातील न्हावे, धोंडखार येथे दोन महिला मुले चोरण्याच्या उद्देशाने आल्याने त्‍यांना पकडण्यात आल्‍याचे वृत्त सर्वत्र पसरले. मात्र त्या महिला रोह्यातील रहिवासी असून चौकशीनंतर त्‍यांना सोडण्यात आल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात लहान मुले चोरणारी कुठलीही टोळी कार्यरत नाही, अशी माहिती देत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी केले आहे.
रोह्यात एसटी थांब्‍याजवळ लहान मुले चोरणारी बुरखाधारी टोळी आहे, याच अफवेने नागरिकांत सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच शनिवारी चणेरा भागातील न्हावे, धोंडखार भागात मुले चोरण्यासाठी आल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोन महिलांना ताब्‍यात घेतले. मात्र त्‍या याच परिसरातील असल्‍याने त्‍यांची ओखळ परेड केल्‍यावर त्‍यांना सोडण्यात आले.

लहान मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्‍याची केवळ अफवा आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही. तेव्हा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेत. कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे, कोणीही कायदा हातात घेऊ नये.
- प्रमोद बाबर, पोलिस निरीक्षक, रोहा
रोहा ः नागरिकांना मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर. (छाया : अल्ताफ चोरडेकर)