पदपथांवर झाडांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथांवर झाडांची विक्री
पदपथांवर झाडांची विक्री

पदपथांवर झाडांची विक्री

sakal_logo
By

धारावी, ता. ६ (बातमीदार) : मुंबईतील काही मुख्य रस्त्यांच्या पदपथांवर झाडे विक्रीच्या नर्सरी चालवल्या जात आहेत. यामुळे पादचाऱ्यांना पदपथांचा वापर करता येत नसल्याने रस्त्यांवरून चालत जावे लागत आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयाकडून धारावीच्या दिशेने येणाऱ्या सुलोचना शेट्टी मार्गावरील पदपथांवर झाडे विक्री केली जात आहे. सुलोचना शेट्टी मार्ग हा धारावीतील ६० फुटी संत कबीर मार्गाला जोडला जातो. धारावीतील अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक धारावीतून सायन रुग्णालयात येण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. तसेच शीव हिंदू स्मशानभूमी तसेच ख्रिस्ती स्मशानभूमीत शालिनी भवन येथे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. यामुळे अनेक जण पायी या ठिकाणी जाणे पसंद करतात. या रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असल्याने धारावीतील रहिवासी पायी जातात. तर धारावीतून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर गेले काही दिवसांपासून झाडे विक्री व त्याचे साहित्याची विक्री केली जात आहे. धारावीतून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे ज्‍येष्ठ नागरिक, महिला आदींना पदपथावरून चालणे मुश्कील होत असल्याने त्यांना मुख्य रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. तसेच रस्त्याच्या कडेलाच अनेक वाहने पार्किंग करून ठेवत असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी पालिकेकडे नागरिकांकडून होत आहे.