भिवंडीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान
भिवंडीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान

भिवंडीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान

sakal_logo
By

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : शासन निर्देशानुसार राज्यात १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी नवरात्री उत्सवात १८ वर्षांवरील महिलांच्या आरोग्य तपासणीबाबत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राज्यभर राबवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने भिवंडी महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या वतीने मनपा शाळा क्रमांक ३४, अवचितपाडा या ठिकाणी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान नुकतेच पार पडले. उपरोक्त योजनेंतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्‌घाटन आमदार रईस शेख यांच्या शुभहस्ते झाले. त्यामध्ये १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दंतरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, फिजिशियन, स्त्री रोग तज्ज्ञ इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.