तलासरीमध्ये लोकवर्गणीतून रुग्णवाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलासरीमध्ये लोकवर्गणीतून रुग्णवाहिका
तलासरीमध्ये लोकवर्गणीतून रुग्णवाहिका

तलासरीमध्ये लोकवर्गणीतून रुग्णवाहिका

sakal_logo
By

कासा, ता. ६ (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील आदिवासी कृतज्ञ समाज बहुद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने दुर्गम भागातील रुग्णांसाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लोकवर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली. आपल्या गरीब, गरजू व निराधार बांधवांना अडचणीच्यावेळी निःस्वार्थ वृत्तीने मदतीचा हात देऊन कृतज्ञता व्यक्त करता यावी करीता एका छोट्याशा मदतरूपी उपक्रमाची सुरुवात व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे सुरू करून गरजूंना मदतीचा हात देण्यास सुरुवात केली.
तलासरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातात जखमींसाठी रुग्णवाहिकेची गरज आहे. भरधाव वाहनांमुळे अनेक अपघाताच्या दुर्घटना घडत असतात, त्यात बहुतांश घटना या गंभीर स्वरूपाच्याच असतात. अपघात स्थळ ते ग्रामीण रुग्णालय तलासरी किंवा इतरत्र रुग्ण पोहचवण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. तलासरीचे रुग्ण मुंबई, सिल्वासा, वलसाड किंवा सुरत आदी ठिकाणी उपचारासाठी पाठवले जातात. मात्र आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या गरीब रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतात. वाहन भाडे देता येत नसल्यामुळे किंवा उपलब्ध नसल्याने अनेकांना जिवाला मुकावे लागते.
यातूनच लोकवर्गणीतून रुग्णवाहिका घेण्याचा विचार समोर आला. त्यास समाजातून भरभरून प्रतिसाद मिळून लोकवर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली. या रुग्णवाहिकेचे पूजन दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर तालुक्यातील सन्माननीय बांधवांच्या उपस्थित संस्थेचे सेवा कार्यालय तलासरी येथे पार पडला.