सोन्याचा ऐवज घेऊन तोतया पोलिस फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याचा ऐवज घेऊन तोतया पोलिस फरार
सोन्याचा ऐवज घेऊन तोतया पोलिस फरार

सोन्याचा ऐवज घेऊन तोतया पोलिस फरार

sakal_logo
By

ठाणे, ता. ६ (वार्ताहर) : पोलिस असल्याची बतावणी करीत ७२ वर्षीय वृद्धेकडील तब्बल एक लाख ८० हजाराचा सोन्याचा ऐवज लंपास करीत दोन अज्ञातांनी पोबारा केला. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी राबोडी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. फिर्यादी वृद्धा ही मंदिरात जात असतानाच दोन अज्ञात इसमांनी पोलिस असल्याची बतावणी केली. तुम्हाला पाच हजाराचा दंड भरावा लागेल, असे सांगत थांबविले. थोड्या वेळातच वृद्धेकडील गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेऊन पोबारा केला. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.