लम्पीमुळे गाय दगावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पीमुळे गाय दगावली
लम्पीमुळे गाय दगावली

लम्पीमुळे गाय दगावली

sakal_logo
By

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथील राधेकृष्ण गोशाळा या ठिकाणी असलेल्या लम्पीची लागण झालेली गाय दगावल्याची घटना मंगळवारी घडली आहे. तालुक्यातील राहनाळ चरणीपाडा या ठिकाणी राधेकृष्ण गोशाळा असून, त्या ठिकाणी एकूण ३४ गायी आहेत. त्या सर्वांना पंचायत समिती पशुधन विभागाकडून लम्पी प्रतिबंधक लस १९ सप्टेंबर रोजी देण्यात आली होती. त्यानंतर येथील एका गाईला लम्पीची लागण झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तिला स्वतंत्र ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. देवश्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राहनाळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय पर्यवेक्षक हे गायीवर उपचार करीत असतानाच मंगळवारी (४ ऑक्टोबर) ती मृत झाली असल्याची माहिती राधेकृष्ण गोशाळेचे सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गोशाळेत औषध फवारणी करून घेत मृत गायीवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.