भांडण सोडवणाऱ्या तरुणाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडण सोडवणाऱ्या तरुणाची हत्या
भांडण सोडवणाऱ्या तरुणाची हत्या

भांडण सोडवणाऱ्या तरुणाची हत्या

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ६ (बातमीदार) : देवीचे विसर्जन करून घरी परतताना झालेला वाद सोडवायला गेलेल्या तरुणाला फरशीचे तुकडे, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना काल दसऱ्याच्या दिवशी घडली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
तरुणाचा मृत्यू होताच आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा, ही मागणी घेऊन संतप्त नागरिकांनी बुधवारी (ता. ६) सकाळी विरार पोलिस ठाण्यात हंगामा केला. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. बैजनाथ शर्मा (वय ३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो विरार पूर्व सहकार नगर येथील रहिवासी आहे. नीलेश नरेश माळी, नितेश ऊर्फ गुड्डू नरेश माळी, अक्षय गिरी अशी आरोपींची नावे आहेत. अन्य अनोळखी सहा पुरुष आणि एक महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. नीलेश आणि नितेश या दोन भावांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
...
टोळक्याने केला हल्ला
विसर्जन करून घरी जात असताना प्रकाश झा यांना ९ ते १० जण मारहाण करीत होते. या वेळी मृत बैजनाथ शर्मा, विकास झा, नित्यानंद शर्मा हे भांडण सोडवायला गेले होते. टोळक्याने लाकडी दांडके, फरशीचे तुकडे आणि लोखंडी गजाने डोक्यात, तोंडावर, नाकावर, अंगावर बेदम वार केली होती. बैजनाथ शर्मा यांचा यात जीव गेला असून अन्य दोन जण जखमी झाले. दोन आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना केले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले आहे.