पालिकेची सुरक्षा अधिक सक्षम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेची सुरक्षा अधिक सक्षम
पालिकेची सुरक्षा अधिक सक्षम

पालिकेची सुरक्षा अधिक सक्षम

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ६ : नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर एक्स-रे, स्कॅनिंग मशीन बसवण्यात आली. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ही मशीन कार्यान्वित करण्यात आली. या मशीनमुळे महापालिका मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या बॅग तपासणे अधिक सुखकारक होऊन सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे.
एक्स-रे बॅगेज स्कॅनिंग मशीनद्वारे महापालिका मुख्यालयात येणाऱ्या व्यक्तीकडील साहित्यांची आता तपासणी होणार आहे. यामुळे असुरक्षित वस्तू असल्याचे त्वरित निदर्शनास येणार आहे. मुख्यालयातील तळमजला व तळघरातील प्रवेशद्वार (बेसमेंट) या दोन ठिकाणी ही मशीन ठेवण्यात येणार आहेत. त्या हाताळण्याचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत भर पडली असून ती अधिक सक्षम झाली आहे. अशाच प्रकारे महापौर कार्यालय व आयुक्त कार्यालय या ठिकाणी पोल डिटेक्टर सुरक्षा साधने कार्यान्वित करण्यात आली आहेत. या माध्यमातून असुरक्षित वस्तूंवर काटेकोर नजर ठेवली जाणार आहे. आता लवकरच व्हिझिटर मॅनेजमेंट सिस्टीम, व्हेईकल स्कॅनिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. याद्वारे महानगरपालिका मुख्यालयात येणाऱ्या नागरिक व अभ्यागतांची सर्व माहिती घेऊन व त्यांना ई-पास देऊनच मुख्यालयात प्रवेश दिला जाईल. त्याचप्रमाणे वाहनांची यांत्रिकी तपासणी करूनच आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.