विकास आराखड्यात एकाच दिवशी १२ हजार हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास आराखड्यात एकाच दिवशी १२ हजार हरकती
विकास आराखड्यात एकाच दिवशी १२ हजार हरकती

विकास आराखड्यात एकाच दिवशी १२ हजार हरकती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ ः नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्याच्या प्रारूप मसुद्यातील आरक्षणांवर हरकती घेणारे तब्बल १२ हजार अर्ज गुरुवारी महापालिकेत सादर झाले. माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी विकास आराखड्याबाबत सुरू केलेल्या जनजागृतीनंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विकास आराखड्यातील किचकट आणि क्लिष्ट बाबी लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आठ विविध प्रभागांत जागर विकास आराखड्याचा हा कार्यक्रम राबवण्यात आला होता.
जागर जनजागृतीचा या नऊ दिवस बेलापूर ते ऐरोलीदरम्यान विविध नोड्समधील जनआंदोलनाची दखल नवी मुंबई मनपाने घेऊन हरकती व सूचनांसाठी मुदतवाढ तत्त्वतः दिली होती; मात्र अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. संकेतस्थळावर मराठी भाषेत अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, परंतु अद्यापही नकाशे आणि टाकलेले आरक्षण याबाबत प्रभाग (वॉर्ड) स्तरीय व्यापक जनजागृती व शिबिरे घ्यावीत, या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात. नऊ दिवस घेण्यात आलेल्या अभियानात नागरिकांनी जमा केलेल्या एकूण १२ हजार सूचना व हरकती या प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार दशरथ भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत आणि युवा नेते निशांत भगत यांनी १२ हजार हरकतींचे अर्ज सादर केले. तसेच हा विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचला नसल्याने महापालिकेने नागरिकांच्या भावनांचा आदर करावा, असेही भगत यांनी सांगितले.