सोनापूर परिसरात स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनापूर परिसरात स्वच्छता मोहीम
सोनापूर परिसरात स्वच्छता मोहीम

सोनापूर परिसरात स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

भांडुप, ता. ६ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम सोनापूर परिसरात जनता दल सेक्युलर ईशान्य मुंबईचे अध्यक्ष संजीव कुमार सदानंदन यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छतेचे महत्त्‍व पटवून देत रस्त्यावरील व कचराकुंडीच्या सभोवताली पडलेला कचरा उचलण्यात आला. जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात वेगवेगळ्या आशयाचे फलक घेतले होते. स्वच्छता हे सर्व रोगांचे औषध आहे, हे या वेळी नागरिकांना पटवून देण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. या वेळी जनता दल कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.