कुरिअरच्या सीमा शुल्काच्या नावाखाली महिलेची १३ लाखाला फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरिअरच्या सीमा शुल्काच्या नावाखाली 
महिलेची १३ लाखाला फसवणूक
कुरिअरच्या सीमा शुल्काच्या नावाखाली महिलेची १३ लाखाला फसवणूक

कुरिअरच्या सीमा शुल्काच्या नावाखाली महिलेची १३ लाखाला फसवणूक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ८ : एका भामट्या डॉक्टरने विदेशातून भारतात मित्राला कुरिअर पाठवायचे आहे, असे सांगत महिलेचा पत्ता मागवून घेतला. त्यानंतर इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करत दुसऱ्या व्यक्तीने त्या कुरिअरवर आपणास सीमा शुल्क, प्राप्तिकर आणि इतर वहन कर भरावा लागणार आहे. हे शुल्क भरणा केले नाहीत तर आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, अशी भीती घालत कल्याणमधील २६ वर्षीय महिलेची तब्बल १३ लाख ४६ हजारांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कल्याणमधील सिंडिकेट परिसरात श्रुतिका सोनजे या राहण्यास असून २६ ऑगस्टला त्यांच्या फोनवर एक संदेश आला. डॉ. अल्बर्ट थॉम्पसन बोलत असून त्यांनी महिलेस तिचा राहण्याचा पत्ता विचारला. यावर आपल्याला पत्ता का हवा आहे, अशी तिने विचारणा केली असता माझ्या एक डॉक्टर मित्राला भारतात स्थायिक व्हायचे असून त्यांच्यासाठी सोने, हिरे, नेकलेस व ८५ हजार पाऊंड्स कुरिअरने पाठवायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर इन्कम टॅक्स ऑफिसर सौम्या असे भासवीत एका महिलेने कस्टम डिपार्टमेंटच्या केसची भीती दाखवत विदेशातील कुरिअर सीमा शुल्क, प्राप्तिकर व इतर वहन कर यांसह पाऊंड्स भारतीय रुपयात बदलण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून ७ सप्टेंबरपर्यंत तिच्याकडून १३ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर तेथून कोणताही प्रतिसाद न आल्यानंतर फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.