शिवाजी पार्क, बीकेसीत कचऱ्याचा खच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी पार्क, बीकेसीत कचऱ्याचा खच
शिवाजी पार्क, बीकेसीत कचऱ्याचा खच

शिवाजी पार्क, बीकेसीत कचऱ्याचा खच

sakal_logo
By

शिवाजी पार्क आणि बीकेसी
मैदानाची पालिकेकडून स्वच्छता
मुंबई, ता. ६ : बुधवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे दोन स्वतंत्र दसरा मेळावे झाल्यानंतर बीकेसी अन् शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. मात्र, पालिकेच्या टीमने तिन्ही शिफ्टमध्ये अहोरात्र काम करत सर्व कचरा गोळा केला. दोन्ही मैदानांतून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. खाद्यपदार्थांची पाकिटे, प्लास्टिक इत्यादींचा त्यात समावेश होता.
शिवाजी पार्कात पालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या टीमने तिन्ही पाळ्यांमध्ये काम केले. रात्री उशिरापर्यंत पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रस्ते स्वच्छ केले. त्यासोबतच क्रिकेटची खेळपट्‍टीही पहाटे चारच्या सुमारास सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आली. ‘स्वच्छतेबाबतही कोणतीही तक्रार आलेली नाही. पालिकेच्या टीमने कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिलेली शौचालयेही वेळोवेळी स्वच्छ केली. त्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईडही फवारण्यात आले होते,’ अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता इरफान काझी यांनी दिली. पालिकेच्या पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कमुळेच काम सोपे झाले. खाद्यपदार्थांची पाकिटे आणि प्लास्टिक असा एकूण सहा टन सुका कचरा गोळा करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.
बीकेसी मैदानातही तिन्ही पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला. जेसीबी आणि डम्परच्या सहाय्याने तिथे कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.