स्थानकावर बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानकावर बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न
स्थानकावर बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न

स्थानकावर बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या विनयभंगाच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. गोरेगाव रेल्वे स्थानकात एका महिलेचे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक करून कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २७ वर्षीय तरुण आरोपीने ५ ऑक्टोबर रोजी गोरेगाव रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग केला. पीडितेचे बळजबरीने चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने पीडित महिला घाबरली आणि आरडाओरडा करू लागली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी महिलेची सुटका केली आणि आरोपीला पकडून जीआरपी कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची बोरिवली जीआरपी कोठडी सुनावली आहे.
नुकतीच जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एकट्याने प्रवास करणाऱ्या २५ वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. पीडितेनेही तिची व्यथा ट्विटरवर शेअर केल्यानंतर जीआरपीने कारवाई करत चार पथके तयार करून आरोपीला अटक केली.