उल्हासनगरात १५ हजार ५०० बोनस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात १५ हजार ५०० बोनस
उल्हासनगरात १५ हजार ५०० बोनस

उल्हासनगरात १५ हजार ५०० बोनस

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : दिवाळी बोनसबाबत अधिकारी आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५०० रुपयांची वाढ करण्यात आल्याने पालिकेवर तीन कोटी ३१ लाख रुपयांचा भार पडला आहे.

गेल्या वर्षी उल्हासनगर महापालिकेकडून १५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. आयुक्त अजीज शेख यांनी मागच्या वर्षीपेक्षा १ रुपया वाढवला. त्यावर आणखीन रक्कम वाढवण्याची मागणी केल्यावर १५ हजार ५०० रुपये बोनसवर अजीज शेख यांनी शिक्कामोर्तब केले. वाढीव ५०० रुपयांचा बोनस मिळाल्याने कामगार संघटनांनी आयुक्त अजीज शेख यांचे आभार मानले आहेत. या बैठकीला आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, करुणा जुईकर, मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अच्युत सासे, कामगार संघटनांचे नेते श्याम गायकवाड, चरणसिंग टाक, दिलीप थोरात, राधाकृष्ण साठे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे प्रतिनिधी माजी स्थायी समिती सभापती विजय पाटील आदी उपस्थित होते.