आयुक्तांमुळे ठाणेदेखील नवी मुंबईसारखे होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्तांमुळे ठाणेदेखील नवी मुंबईसारखे होईल
आयुक्तांमुळे ठाणेदेखील नवी मुंबईसारखे होईल

आयुक्तांमुळे ठाणेदेखील नवी मुंबईसारखे होईल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : अधिकाऱ्यांना मुक्तहस्ते काम करण्याची संधी दिल्यास ते चांगले काम करतात. त्यामुळे आयुक्त अभिजित बांगर यांना तसे काम करण्याची संधी दिली तर ते ठाणे देखील नवी मुंबईसारखे चांगले करून दाखवतील, असे मत मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी व्यक्त केले. ते पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आले होते, त्यावेळी बोलत होते.

दिवा येथील रेल्वे पुलाचे काम सुरू असून या कामात तेथील काही लोक बाधित होत आहेत. तसेच या पुलाच्या उतरण्याच्या दिशेला कुठलीही जोड दिसत नाही. यासंदर्भात परिसरातील समस्या आणि इतर विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार राजू पाटील हे ठाणे महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी आयुक्त अभिजित बांगर आणि शहर विकास विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, जेव्हा तुम्ही एखाद्या परिसरातच काम करा, याच विभागाच्या परिसरातील कामे केली पाहिजे, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात येते. त्यावेळी त्या शहराची दुरवस्था झाल्याचे दिसून येणार. त्यामुळे जर अभिजित बांगर यांना कामाची मोकळीक दिल्यास ते ठाण्याचे देखील नवी मुंबई करून दाखवतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.