सी-लिंक अपघातप्रकरणी एक आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सी-लिंक अपघातप्रकरणी एक आरोपी अटकेत
सी-लिंक अपघातप्रकरणी एक आरोपी अटकेत

सी-लिंक अपघातप्रकरणी एक आरोपी अटकेत

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : वांद्रे-वरळी सी-लिंकवर चार कार आणि अॅम्ब्युलन्सची धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला; तर तीन जण गंभीर जखमी झाले. सध्या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका एसयूव्ही गाडी चालकाला अटक करण्यात आली आहे. इरफान अब्दुल रहीम बेलकिया असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाला गुरुवारी (ता. ६) अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.