पेडिएट्रिक कार्डियक रूग्‍णांचा सन्‍मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेडिएट्रिक कार्डियक रूग्‍णांचा सन्‍मान
पेडिएट्रिक कार्डियक रूग्‍णांचा सन्‍मान

पेडिएट्रिक कार्डियक रूग्‍णांचा सन्‍मान

sakal_logo
By

मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने त्‍यांच्‍या पेडिॲट्रिक कार्डियक रुग्णांचा नुकताच सत्कार केला. यावेळी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती दर्शवून वंचित मुलांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्‍यामध्‍ये मोलाची भूमिका बजावली. या कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी चंद्रपूरहून उपचारासाठी आलेल्या १५ मुलांसोबत वेळ व्‍यतीत केला. त्‍यांनी या मुलांना उत्तम आधार मिळण्‍यासोबत आवश्यक ते उपचार मिळतील, असे आश्वासन दिले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत चंद्रपूर येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिबिरातून या मुलांची निवड करण्यात आली आणि या उपक्रमाला पालकमंत्र्यांचे सहकार्य लाभले. या वर्षाच्या सुरुवातीला जूनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. ज्‍यामध्‍ये ६ महिने ते १५ वर्षे वयोगटातील १०० हून अधिक मुले सहभागी झाली होती. फोर्टिस हॉस्पिटल्‍सच्‍या संचालिका डॉ. एस. नारायणी म्‍हणाल्‍या, ‘‘आमचा विश्‍वास आहे की सामाजिक-आर्थिक स्थितीकडे न पाहता सर्व मुलांना आरोग्‍यदायी जीवन जगण्‍याचा अधिकार आहे. म्‍हणून आम्‍ही उपलब्‍ध होण्‍याजोग्या व दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा देण्‍यासाठी पुढाकार घेत आहोत. अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आमचा वंचित मुलांपर्यंत पोहोचत त्‍यांना सर्वोत्तम उपचार उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. मी सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या चमूचे अशा प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित करण्यास मदत केल्याबद्दल आभार मानते.’’