मुलुंडमध्ये मिळणार स्टॅम्प पेपर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये मिळणार स्टॅम्प पेपर
मुलुंडमध्ये मिळणार स्टॅम्प पेपर

मुलुंडमध्ये मिळणार स्टॅम्प पेपर

sakal_logo
By

मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः मुलुंड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना स्टॅम्प पेपरसाठी विक्रोळी, ठाणे येथे जावे लागत होते. तेथे जाऊनसुद्धा त्यांना रांगेमध्ये तासनतास उभे रहावे लागत असे. परिणामी नागरिकांची त्यामुळे गैरसोय होत होती. नेमकी हीच गंभीर बाब ओळखून मुलुंड ॲडव्‍होकेट बार असोसिएशन यांनी पुढाकार घेऊन नागरिकांसाठी स्टॅम्प पेपर केंद्राची सुरुवात केली आहे. यापुढे मुलुंडमधील नागरिकांना मुलुंड पश्चिमेतील मुलुंड कोर्ट येथे स्टॅम्प पेपर विकत घेता येतील, अशी माहिती बार असोसिएशन यांनी दिली.