अनधिकृत बांधकाम झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकाम झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई
अनधिकृत बांधकाम झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई

अनधिकृत बांधकाम झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई

sakal_logo
By

विरार, ता. ८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रात वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा विषय न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ज्या प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत, त्या ठिकाणच्या सहायक आयुक्त, अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचे प्रमुख, इंजिनियर यांच्यावर कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे. पालिका हद्दीत जवळपास १० हजार अनधिकृत बांधकामे असल्याचे पालिकेने सांगितले असले तरी या ठिकाणी हजारोंनी अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार यापुढे ज्या प्रभागात अनधिकृत बांधकामे उभी राहतील, तेथील अधिकाऱ्यांविरोधात कडक निर्णय घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.