दीपक कुरळेकरांना मूळ संवर्गात परत पाठवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपक कुरळेकरांना मूळ संवर्गात परत पाठवा
दीपक कुरळेकरांना मूळ संवर्गात परत पाठवा

दीपक कुरळेकरांना मूळ संवर्गात परत पाठवा

sakal_logo
By

विरार, ता. ८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या आस्थापना विभागात उपायुक्तपदी दीपक कुरळेकर यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी ऑगस्ट २०२०मध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रतिनियुक्तीवर येऊन दोन वर्षे उलटली तरी देखील कुरळेकरांची अद्याप बदली करण्यात आली नाही. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी राज्याच्या सामान्य विभागाकडे तक्रार केली आहे. पालिकेतील सेवा ज्येष्ठता यादी तयार होऊन चार महिने झाले तरी त्यावर कुरळेकर यांनी कारवाई न करता कर्मच्याऱ्यांना बढतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप ही त्यांनी सामान्य प्रशासनाला पाठवलेल्या तक्रारीत केला आहे.
राज्य शासनाच्या बदली व प्रतिनियुक्तीच्या धोरणाबाबत माहिती देताना चरण भट यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार, सेवानिवृत्तीस दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांस मूळ संवर्गात परत येणे आवश्यक आहे, असे स्पष्ट नमूद आहे. या धोरणानुसार मुळ संवर्गात बदली होणे अपेक्षित असतानाही कुरळेकर आजही वसई-विरार महापालिकेतच ठाण मांडून बसून आहेत. त्यामुळे दीपक कुरळेकरांना त्यांच्या मूळ संवर्गात परत पाठवावे, अशी मागणी चरण भट यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे. त्याच बरोबर बदल्यामधील भ्रष्टाचाराची आयुका तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.