सायकल ट्रॅकच्या विळख्यात गांधी मार्केट व पदपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल ट्रॅकच्या विळख्यात गांधी मार्केट व पदपथ
सायकल ट्रॅकच्या विळख्यात गांधी मार्केट व पदपथ

सायकल ट्रॅकच्या विळख्यात गांधी मार्केट व पदपथ

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ८ (बातमीदार) : सायन गांधी मार्केट परिसरातील पदपथावर गर्दीच्या भागात सायकल ट्रॅक बनवला आहे. यामुळे आधीच वाहतुकीची कोंडी होत असलेल्‍या ठिकाणी सायकल ट्रॅकची भर पडल्याने अडथळ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सायकल ट्रॅकच्या विळख्यातून सुटका करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
सायन गांधी मार्केटसमोर उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर याची त्वरित दखल घेत मनसेच्या व्यापारी संघटनेने याला विरोध करत निषेध नोंदवला. ज्या जागी पूर्वी पार्किंग होती, त्या ठिकाणी आता सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. असे करून लोकांच्या पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा लोकांना काय हवे याचा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांसह नागरिकांनी दिली.
सायकल ट्रॅकविरोधात शुक्रवारी मनसेचे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली सायन गांधी मार्केट येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी सायकल ट्रॅक हटवण्यासाठी पालिकेच्या परिमंडळ दोनच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात येत्या आठ दिवसांत बैठक घेण्यात येणार असून बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, तर हा सायकल ट्रॅक येथून हटवण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

मार्केट भागात किंवा गर्दीच्या ठिकाणी सायकल ट्रॅक नसतो; मात्र आम्ही काही तरी करून दाखवले, यासाठी हा सायकल ट्रॅक लोकांच्या माथी मारलेला आहे.
- यशवंत किल्लेदार, व्‍यापारी सेना अध्‍यक्ष, मनसे