एकादशीला देवींच्या पाच मूर्तींचे विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकादशीला देवींच्या पाच मूर्तींचे विसर्जन
एकादशीला देवींच्या पाच मूर्तींचे विसर्जन

एकादशीला देवींच्या पाच मूर्तींचे विसर्जन

sakal_logo
By

कांदिवली, ता. ८ (बातमीदार) ः कांदिवली गावठाण तलावात दशमीला देवींच्या २३१ मूर्तींचे निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले. त्‍यानंतर एकादशीला रात्री १२ च्या दरम्यान सिंग इस्टेटची आई माऊली, जिद्दी मराठा आणि सिद्धी विनायकची आई माऊली यांच्‍यासह इतर दोन मंडळे मालाड आणि कांदिवली पूर्वेकडून विसर्जनासाठी कांदिवली गावठाण तलावाजवळ आल्याने विसर्जन कार्य करणाऱ्या यंग स्टार क्रीडा मंडळाच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांना व पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.
कांदिवली गावठाण तलावात यंग स्टार क्रीडा मंडळाच्या वतीने दशमीला देवीच्या २३१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरा विसर्जन झाल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी दशमीला लवकर झोपले; मात्र अचानक अध्यक्ष सुनील मन्वाचार्य यांना तलावावर विसर्जनासाठी देवीच्या मूर्ती आल्याचे समजले. सुनील यांनी तातडीने पोलिस ठाणे आणि कार्यकर्त्यांना फोन करून बोलावले. यापूर्वी दशमीला विसर्जन केले नाही; मात्र यंदा अचानक विसर्जनासाठी मूर्ती आल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
दरवर्षी ‘सिद्धी विनायकची माऊली’ मंडळाच्या वतीने एकादशीला मार्वे समुद्रात देवीच्‍या मूर्तीचे विसर्जन होते; मात्र या वर्षी महिला व तरुणांची संख्या जास्त असल्याने पूर्वेकडील सर्व मंडळांनी या वर्षी कांदिवली गावठाण तलावात विसर्जन करण्याचे ठरवल्याने आम्ही इकडे आलो, असे मंडळाचा कार्यकर्ता गौरेश लुडबे याने सांगितले.