पालिकेच्‍या सेवानिवृत्त शिक्षकांना तत्काळ निवृत्तीवेतन द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्‍या सेवानिवृत्त शिक्षकांना तत्काळ निवृत्तीवेतन द्या
पालिकेच्‍या सेवानिवृत्त शिक्षकांना तत्काळ निवृत्तीवेतन द्या

पालिकेच्‍या सेवानिवृत्त शिक्षकांना तत्काळ निवृत्तीवेतन द्या

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : महापालिकेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन विषयक लाभ सात दिवसांत देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेला दिले आहेत. कांदिवली येथील ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात लोढा बोलत होते.
महापालिकेचे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतरही बराच कालावधी उलटून गेला तरी सेवानिवृत्तीचे व इतर देय लाभ मिळत नाहीत, अशी तक्रार कांदिवलीचे (पूर्व) आमदार अतुल भातखळकर यांनी मांडली होती. त्यावर निवृत्त शिक्षकांची प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, त्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये, असे निर्देशही लोढा यांनी दिले.
पाणी कमी दाबाने येणे, पाणी वेळेत न येणे, परिसर स्वच्छता, शौचालय, नादुरुस्त पथदिवे, झोपडपट्टी पुनर्विकासातील दिरंगाई आदी विषयांवर तीनशे नागरिकांनी तक्रार अर्ज दिले, तर शंभर अर्जदारांनी प्रत्यक्ष समस्या मांडल्या. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना लोढा यांनी दिल्या. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार प्रकाश सुर्वे, उपायुक्त भाग्यश्री कापसे उपस्थित होते.