मासिक पाळी संदर्भात माहिती सत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासिक पाळी संदर्भात माहिती सत्र
मासिक पाळी संदर्भात माहिती सत्र

मासिक पाळी संदर्भात माहिती सत्र

sakal_logo
By

गोरेगाव, ता. ८ (बातमीदार) : भाकर फाऊंडेशनमार्फत गोरेगाव येथील मोतीलाल नगर मनपा शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय, त्यादरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातील चुकीच्या रूढी-परंपरा, गैरसमज तसेच वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी करायची, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. शाळेतील शौचालय व विभागातील शौचालयात सॅनिटरी पॅडची विल्हेवाट संदर्भात सूचनांचे फलक लावण्यात येणार आहेत. एकमेकांच्या मासिक पाळीचा सन्मान करण्याचा निर्धारही या वेळी करण्यात आला. भाकर फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष दीपक सोनावणे, मंगला कुमठे व शाळेच्या शिक्षिका आशा पवार डोईफोडे आणि मुंबई विद्यापीठातील एमएसडब्‍ल्‍यूचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.