लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर जरब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर जरब
लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर जरब

लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर जरब

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे कामचुकार, लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक पावले उचलत कामावर वेळेत न येणाऱ्यांची हजेरीच न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये आली असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे पालिकेच्या मुख्यालयासह प्रभाग समिती, आरोग्य विभागासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उशिराने कामावर येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या ठाणेकरांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी खोळंबा होत असतो. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आस्थापना विभागाला निर्देश दिले असून त्यानुसार पालिकेच्या आस्थापना विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पालिकेने मस्टरच गायब करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी पहिल्याच दिवशी ३० टक्के कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी उशिराने आल्याचे दिसून आले आहे; तर यापुढेही ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी लावण्यात येणारी थम्ब मशीन बंद ठेवण्यात आली होती. ती लवकरच सुरू केली जाणार आहे.
- मारुती खोडके,
उपायुक्त, ठाणे पालिका

तीन दिवस विलंब झाल्यास सुट्टी
उशिराने येऊनही अनेक कर्मचारी मस्टरवर सही करण्याचा प्रयत्न करतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी पालिकेच्या आस्थापना विभागाने मस्टर आपल्या ताब्यात घेतले असून तीन दिवस उशिराने येणाऱ्याची एक दिवसाची सीएल (कॅज्युअल लीव्ह) लावली जाईल, असा निर्णयही घेण्यात आला आहे.