उरण तालुक्यात निवडणुकीचे वारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरण तालुक्यात निवडणुकीचे वारे
उरण तालुक्यात निवडणुकीचे वारे

उरण तालुक्यात निवडणुकीचे वारे

sakal_logo
By

उरण, ता. ९ (वार्ताहर) : राज्यातील ७६४९ ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. यात उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींचादेखील समावेश असल्याने मतदार याद्या बनवण्याच्या कामाला वेग आला आहे.
राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. यात उरण तालुक्यातील पाणजे, डोंगरी, घारापुरी, रानसई, पुनाडे, सारडे, नवीन शेवा, धुतूम, करळ, कळंबुसरे, बोकडविरा, वशेणी, पागोटे, पिरकोन, जसखार, चिर्ले, भेंडखळ आणि नवघर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. साधारण नोहेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. ठिकठिकाणी उमेदवारांची चाचपणी सुरू असून प्रभागवार उमेदवार उभे करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.
------------------------------------------------------
प्रभागनिहाय अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध
या निवडणुकीसाठी ३१ मे २०२२ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी गृहित धरण्यात येणार आहे. त्यामुळे याकामी ग्रामसेवकांना कामाला लावण्यात आले असून १३ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर हरकती मांडण्यासाठी १३ ते १८ ऑक्टोबर हा कालावधी ठरविण्यात आला आहे. प्रभागनिहाय अंतिम यादी शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) प्रसिद्ध होणार आहे.