नोकारीच्या प्रलोभनाने फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकारीच्या प्रलोभनाने फसवणूक
नोकारीच्या प्रलोभनाने फसवणूक

नोकारीच्या प्रलोभनाने फसवणूक

sakal_logo
By

ठाणे, ता. ८ (वार्ताहर) ः खासगी कंपनीत नोकरी लावण्याच्या प्रलोभनाने ४४ वर्षीय महिलेला चौकडीने ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने चौघांच्या विरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला माजीवडा येथे राहणारी असून महिलेस प्रदीप गुप्ता, अमन शर्मा, शैलेश शाह व फ्रान्सिस फर्नाण्डिस यांनी मोठ्या कंपनीत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर लिंक पाठवली. लिंक उघडली असता महिलेच्या बँकेतील दोन लाख ५० हजार ४४६ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. कापूरबावडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.