सफरचंदाच्या कंटेनरमधून ५०० कोटींचे कोकेन जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफरचंदाच्या कंटेनरमधून ५०० कोटींचे कोकेन जप्त
सफरचंदाच्या कंटेनरमधून ५०० कोटींचे कोकेन जप्त

सफरचंदाच्या कंटेनरमधून ५०० कोटींचे कोकेन जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) झोन युनिटने आंतरराष्ट्रीय बाजारात ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ५०.२३ किलो कोकेन जप्त केले आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. ६ ऑक्टोबरला न्हावा-शेवा बंदरावर डीआरआयने दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेला हिरव्या सफरचंदाचा कंटेनर रोखला. त्यातील मालाची तपासणी केल्यावर सफरचंदाच्या बॉक्समध्ये कोकेनच्या प्रत्येकी सुमारे एक किलो वजनाच्या मोठ्या विटा लपविल्याचे उघड झाले. या कारवाईत ५०.२३ किलो वजनाच्या आणि ५०२ कोटी रुपयांच्या एकूण ५० विटा जप्त करण्यात आल्या. हा कंटेनर वाशी येथील एका व्यापाऱ्याच्या नावाने दक्षिण आफ्रिकेतून आयात केला जात होता. याच व्यापाऱ्याला महिन्याच्या सुरुवातीला डीआरआयने १९८ किलो एमडी आणि ९ किलो कोकेन तस्करीप्रकरणी अटक केली होती.