रिक्षाचालकाच्या मदतीने खुनाचा उलगडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकाच्या मदतीने खुनाचा उलगडा
रिक्षाचालकाच्या मदतीने खुनाचा उलगडा

रिक्षाचालकाच्या मदतीने खुनाचा उलगडा

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : कुर्ल्यातील एका नाल्यात १६ वर्षीय मुलीचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात नेहरूनगर पोलिसांनी कट आणि हत्येच्या आरोपात तीन महिलांना अटक केली आहे. तीन महिलांपैकी एका महिलेच्या पतीचे मृत मुलीशी विवाहबाह्य असलेले संबंध या हत्येचे कारण बनले आहे. दरम्यान, मुलीच्या हत्येचा उलगडा करण्यात रिक्षाचालकाने पोलिसांना मोलाची मदत केली. याबाबतची प्राथमिक माहिती रिक्षाचालकाने पोलिसांना दिली होती. हत्येचा आरोप असलेल्या दोन महिलांना त्याने रिक्षातून नेले होते. त्याने या महिलांना कुठे सोडले होते ते ठिकाणही सांगितले. तसेच आरोपी महिलांची ओळख पटवली. याबद्दल नेहरूनगर पोलिस रिक्षाचालकाचा सत्कार करणार आहेत.