अंबरनाथ रोटरीतर्फे महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ रोटरीतर्फे महिलांचा सन्मान
अंबरनाथ रोटरीतर्फे महिलांचा सन्मान

अंबरनाथ रोटरीतर्फे महिलांचा सन्मान

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) : रोटरी क्‍लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीतर्फे विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लेखिका मीना गोडखिंडी व अध्यक्षा म्हणून दर्शना जेठानी उपस्थित होत्या.
क्लबचे अध्यक्ष गोकुळ पाटील, सेक्रेटरी डॉ. अविनाश नारायणकर आणि प्रकल्प प्रमुख संगीता राजपाल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नवदुर्गा कार्यक्रमात लेखिका मीना गोडखिंडी आणि अध्यक्षा दर्शना जेठानी यांच्या हस्ते गीता गडकर, गायत्री कुलकर्णी, कविता करंबेळकर, किरण जाधव, वृषाली पाटील, पल्लवी जाधव आदी महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विवेकानंद केंद्राचे गेली अनेक वर्षे सातत्याने काम करणाऱ्या अश्विनी कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. क्लब अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी रोटरीच्या कामाची माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळातील व आधुनिक काळातील महिलांच्या कर्तृत्वाचा धावता आढावा मीना गोडखिंडी यांनी यावेळी घेतला.